*⚡मालवण ता.१६-:* मालवण तालुक्यातील वराड- सावरवाड येथील अक्षय फाटक या युवकाला दुर्धर अशा ब्लड कॅन्सर आजाराचे निदान झाल्यावर त्याच्या उपचारासाठी लागणाऱ्या निधीची पूर्तता करण्यासाठी समाजातील विविध घटकांतून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. कट्टा पंचक्रोशीतील आभाळमाया या व्हाट्सएप ग्रुपने मदतीचे आवाहन करून आपल्या मित्रपरिवारातर्फे २ लाख ४२ हजार १९० रुपये एवढी मदत करण्यात आली आहे. या निधीचा धनादेश अक्षय याच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला. ज्यांना कोणाला अक्षय याला मदत करायची असेल तर Akshay Shrikrishna Phatak, Account:- No. 20298112319, IFSC:- SBIN0012213 या अकाउंटवर पैसे पाठवावेत. किंवा अक्षय संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे (मो.नं.09987762896) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आभाळमाया ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.
कॅन्सरग्रस्त युवकाला आभाळमाया व्हाट्सएप ग्रुपची मदत
