*⚡बांदा ता.१६-:* बांदा शहराला आज सायंकाळी मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. आज सलग चौथ्या दिवशी पाऊस कोसळल्याने याचा फटका काजू बागायतदाराना मोठ्या प्रमाणात बसला आहे. अचानक पाऊस सुरू झाल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. शहरात आज दुपार पासूनच पावसाचे वातावरण होते. बांदा शहरासह ग्रामीण भागात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. बांदा दशक्रोशीत काजू कलमांना मोहोर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र उशिरा अचानक मुसळधार पाऊस दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुसळधार पावसामुळे मोहोर वाचविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बांदा शहराला मुसळधार पावसाने झोडपले
