हंडी कालिका मंदिरात १८ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील हडी येथील ग्रामदेवता श्री देवी कालिका मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त दि १८ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत हडी खालचीवाडी येथील श्री देवी कालिका मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५ वा. देवीच्या मंगल स्नानाने कार्यक्रमाची सुरुवात, ७ वा. देवीला सुवासिक फुलांची मनमोहक आरास, ८.३० वा.. महाआरती, ९ वा. ओटी भरण्यास प्रारंभ व नवसाची पूर्तता, ११ वा. गावराठीच्या देवांचे नागेश्वर मंदिर येथून कालिका मंदिरामध्ये वाजत-गाजत आगमन, सायंकाळी ७ वा. दीपोत्सव, ७.३० ते रात्री १० महाप्रसाद, १० वा. गडगेवाडी सेवा मंडळ, हडी यांचे भजन, ११ वा. पोथी (भगवत गीता) वाचन व बारा-पाच मानकऱ्यांच्या हस्ते गणेश पूंजन, १२ वा. गावराठी व पालखी प्रदक्षिणा सोहळा. यात देव गावडेपुरुष भेट, नंतर ‘नवसाला पावणारी हाकेला धावणारी कालिका माता’ हा कार्यक्रम होणार आहे.

You cannot copy content of this page