हिंदी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुद्धा मजल
मालवण दि प्रतिनिधी हल्लीच्या आधुनिक युगात ओटीटी फ्लॅटफॉर्मद्वारे प्रसारित होणाऱ्या वेबसिरीज मध्ये होणारा अश्लीलतेचा भडिमार बाजूला सारून केवळ मनोरंजन हा हेतू ठेवून सर्व स्तरातील माणसे वेबसिरीज पाहू शकतील अशा रापची ओरिजनल्स या वेबसिरीज चॅनलचे प्रमोशन नुकतेच चॅनेलचे मुंबई जोगेश्वरी बेहरामबाग सिग्नल, रेंज हाइट बिल्डिंग येथे करण्यात आले. या चॅनेल द्वारे चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीबरोबरच आता सिंधुदुर्गातील प्रसाद भाटकर आणि आशिष हडकर (मालवण) या दोघांनी धरम गुप्ता या प्रमुख सहकाऱ्यांला साथीला घेत हिंदी ओटीटी प्लॅटफॉर्म क्षेत्रातही मजल मारली आहे रापची ओरीजनल्स या एका हिंदी वेबसेरिज चॅनेलचे मुंबई जोगेश्वरी येथे प्रमोशन करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी या चॅनेलच प्रमोशन करण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रक्षेपण स्थगित करण्यात आले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. त्यामुळे या चॅनेलचे प्रसारण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तीन युवकांनी एकत्र येवून हा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. यापैकी दोघे युवक हे सिंधुदुर्गातील आहेत. या चॅनेलची क्रीएटीव्हीटी पाहणारे धरम गुप्ता हे युपीमधील आहेत. त्यांना प्रॉडक्शन हाउसचा ब-याच वर्षांचा अनुभव आहे. प्रसाद भाटकर हे मेकअप आर्टीस्ट असून त्यांनाही खूप वर्षे हया क्षेत्रात अनुभव आहे. आशिष हडकर हे लाइसेनिंग कॉन्ट्रॅक्टर या क्षेत्रात असुन त्यांच्यासाठी हे क्षेत्र नवीन आहे. वेबसेरीजच्या निमीत्ताने त्यांचे फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण झाले आहे. कोणताही अश्लील कंटेंट नसल्यामुळे या चॅनेलवरील वेबसेरिज आपण आपल्या कुटुंबासमवेत पाहु शकता. दर्जाच्या बाबतीत कुठेही तडजोड करण्यात आली नाही. अतिशय सुबक पद्धतीने रचना आणि चित्रीकरण करण्यात आले आहे.. करमणुकीचा असलेला हा चॅनेल सध्या फ्री असुन फक्त ३४ एमबी साईजचे हे अँप्लिकेशन आहे. प्ले स्टोरमधुन हे अँप डाउनलोड करायचे आहे. या ओटिटी प्लॅटफॉर्मवरून अतिशय दर्जेदार आणि मनोरंजनात्मक वेब सिरिज प्रसारित होत आहेत. सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन चॅनेलच्या वतीने करण्यात आले आहे.

