सावंतवाडी सावंतवाडी शहरातील माठेवाडा भागातील ऐतिहासिक श्री देव आत्मेश्वर मंदिर कलशारोहण समारंभ गुरुवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार असून या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन माठेवाडा मित्र मंडळ व श्री देव आत्मेश्वर स्थानिक सल्लागार उपसमिती यांनी केले आहे या मंदिराचा कलशारोहण समारंभ प्रसंगी विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे 18 नोव्हेंबर रोजी 8 30 वा धार्मिक कार्यक्रम, देहशुद्धी, प्रायश्चित, देवता वंदन, गणपती पूजन, पुण्याह वाचन, नांदी श्राद्ध, संभार दान व नंतर प्राकारशुद्धी, उदकशांत, कलशुद्धीकरण, नवग्रहस्थापन, अग्नीस्थापन, पूर्णाहूती इ कार्यक्रम मिलिंद प्रकाश चोणकर व मानसी मिलिंद चोणकर यांच्या हस्ते होणार आहेत तर दु 12 40 वा कलशारोहण, दु 1 वा महाआरती व समुदायिक प्रार्थना, दु 1 30 वा महाप्रसाद, साय 4 30 वा सुश्राव्य भजन, साय 6 30 वा दीपोत्सव होणार आहे
श्री आत्मेश्र्वर मंदिर कलशारोहण समारंभ १८ नोव्हेंबरला होणार संपन्न
