वैभववाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार-शिल्पकार संघटनेच्या वतीने उद्या १३ नोव्हेंबर रोजी वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयात सकाळी १०.०० वाजता सुतार समाजाच्या ऐक्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार-शिल्पकार समाज मंडळाचे अध्यक्ष आनंद मेस्त्री हे उपस्थित राहणार असून यावेळी सुतार समाजासमोरील आव्हाने, समस्या यांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच समाजाचा एकोपा वाढवा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तरी सर्व सुतार समाज बांधवांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा लोरे जिल्हा परिषद शक्ती केंद्र प्रमुख रितेश मेस्त्री यांनी केले आहे.
सुतार समाज ऐक्य मेळाव्याचे १३ नोव्हेंबरला आयोजन…
