१२ वाजता पत्रकार परिषद; आमदार केसरकर यांच्या आरोपावर काय प्रतिउत्तर देणार नगराध्यक्ष परब; सावंतवाडीकरांचे लागले लक्ष
*⚡सावंतवाडी ता.१३-:* नगराध्यक्ष संजू परब यांची आज १२ वाजता नगरपालिकेत पत्रकार परिषद आयोजित केली असून, कालच आमदार दीपक केसरकर यांनी आपण आणलेल्या निधीतून टक्केवारी घेत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्या आरोपावर नगराध्यक्ष संजू परब काय प्रतिउत्तर देतात. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले असून, आमदार दीपक केसरकर आणि नगराध्यक्ष संजू परब यांच्यात आरोप – प्रत्यारोप करण्यात येत असून, वाद पेटत असल्याचे दिसून येत आहे.
