मालवणचे अॅड. सुदाम म्हाडगुत वृद्धापकाळाने निधन

*⚡मालवण ता.०९-:* मालवण भरड येथील रहिवासी आणि सहकार क्षेत्रातील विधीज्ञ अॅड. सुदाम महादेव म्हाडगुत (वय-८५) यांचे आज गुरुवारी मध्यरात्री एक वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. अॅड. सुदाम म्हाडगुत हे मुंबई येथे सहकार क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्था या क्षेत्रात विधीज्ञ म्हणून ख्याती प्राप्त केली होती परोपकारी व मनमिळाऊ स्वभावामुळे ते जनमानसात लोकप्रिय होते आज सकाळी दांडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, मुली, सूना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. छायाचित्रकार समीर म्हाडगुत व माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांचे ते वडील होत.

You cannot copy content of this page