विमानाने येणाऱ्या ७५ प्रवाशांसाठी रेड कार्पेट,तर हायवेवरून येणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी खड्डे

परशुराम उपरकर यांची टिका;भांडणाऱ्यांना नॕशनल हायवेची दूर्दशा दिसत नाही का?

*⚡कणकवली ता.०९-:* चिपी विमानतळ उद्घाटनावरून सुरू असलेला शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वादंग आणि उद्घाटनाचा श्रेयवाद विमानातून येणाऱ्या फक्त ७५ प्रवाशांसाठी आहे. मात्र ज्या मुंबई-गोवा महामार्गावरून लाखो प्रवासी ये-जा करत आहेत, त्या महामार्गाची झालेली दूर्दशा या कोणत्याच राजकीय पक्षाला दिसत नाही का? अशी टिका मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी केली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येऊन उद्घाटनाचा घाट मांडण्यापेक्षा आॕनलाईन उद्घाटन करण्यात यावं आणि विमानतळासाठी ज्या लोकांच्या जमिनी कवडीभावाने घेतल्या त्यामधीलच कोणा जेष्ठ नागरिकाकडून नारळ फोडून शुभारंभ करावा, अशी मागणीही मनसेच्यावतीने परशुराम उपरकर यांंनी केली आहे. कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर बोलत होते. उपरकर म्हणाले,सध्या चिपी विमानतळाच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत वादंग सुरु आहे. राज्यसरकारच्या वतीने सुरुवातीला ७ सप्टेंबरला उद्घाटन करणार म्हणून सांगितलं गेलं. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून ९ सप्टेंबरला उद्घाटन करणार म्हणून सांगण्यात आलं. हा आणि राज्य सरकारवर केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याआधी चिपी विमानतळाचं गणेश चतुर्थीला तीन वेळा उद्घाटन केलं. परंतु त्यांना विमानतळ सुरु करता आलं नाही. त्यानंतर सेना-भाजपाचं सरकार सत्तेत आलं. परंतु विमानतळाबाबत कोणताच निर्णय झाला नाही. केवळ गणपती आणून जनतेला फसवण्याचं काम या सर्वांनी केलं आणि आजही जनतेला फसवण्याचंच काम केलं जातंय. आज गणेशोत्सवानिमित्त लाखो प्रवासी मुंबई-गोवा हायवेवरून जिल्ह्यात दाखल होत आहेत. परंतु या महामार्गाची स्थिती अतिशय हलाखीची झाली आहे. याकडे केंद्र शासन असो किंवा राज्य सरकार कोणीही लक्ष देत नाही. हायवेच्या प्रश्नांनी जनता हैराण झाली असताना त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. परंतु विमानतळाचा श्रेयवाद घेण्यासाठी यांची धडपड चाललेली आहे. देशाचे राष्ट्रपती जर एका लहान मुलाकडून रस्त्याचं उद्घाटन करून घेत असतील, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येऊन उद्घाटनाचा घाट मांडण्यापेक्षा आॕनलाईन उद्घाटन करण्यात यावं आणि विमानतळासाठी ज्या लोकांच्या जमिनी कवडीभावाने घेतल्यात त्यामधीलच कोणा जेष्ठ नागरिकाकडून नारळ फोडून शुभारंभ करावा, अशी मागणीही मनसेच्या वतीने परशुराम उपरकर यांंनी केली आहे. भाजपाने किरीट सोमय्यांना आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी सिंधुदुर्गात पाठवलं. परंतु तेही या हायवेच्या प्रश्नावर का बोलले नाहीत? एअरपोर्ट आॕथोरीटी ने हायवेचं काम पूर्ण केलं असलं, तरी ज्या महामार्गावरून सर्वसामान्य लाखो प्रवाशांचा प्रवास होत असतो, तो महामार्ग सुरळीत करून प्रवाशांचा प्रवास सुखकर करणं सरकारला जमलं नाही. रस्त्याची कामं करणाऱ्या ठेकेदारांचे दोन वर्ष टेंडर न आल्याने ११३ कोटीची बिलं प्रलंबित आहेत. दोन वर्ष कोणत्याही प्रकारचा निधी रस्त्यासाठी आलेला नाही. बदली आणि निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी अजून भरतीही झालेली नाही. झालेल्या परंतु कोट्यवधीच्या घोषणा केंद्र आणि राज्य सरकारकडून केल्या जात आहेत. या दोन्ही सरकारला जनतेचं काही पडलेलं नाही. फक्त आमिष दाखवून जनतेला विकासाच्या मुद्द्यापासून विचलीत करायचं काम सरकार करत आहे. विमानतळाचं उद्घाटन होतंय त्याला आमच्या शुभेच्छाच आहेत. परंतु त्याचवेळी सरकारने जिल्ह्यातील रस्त्यांकडेही तेवढ्याच प्राधान्याने लक्ष द्यावं आणि जनतेला दिलासा द्यावा, असे परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page