कुडाळ भंगसाळ नदीत मगरीचे दर्शन

नदीच्या काठावर आली चार ते साडेचार फूट लांबीची मगर

*⚡कुडाळ ता.०९-:* कुडाळ हायवेलगत असलेल्या भंगसाळ नदीमध्ये आज पुन्हा एकदा मगरीचे दर्शन पहावयास मिळाले . आज भंगसाळ नदीमध्ये चार ते साडेचार फूट लांबीची भली मोठी मगर नदीच्या काठावर पहावयास मिळाली. ही मगर पहाण्यासाठी हायवेने जा- ये करणाऱ्या पादचारी व वाहन चालक आपली वाहने थांबवून मगर पहाण्यासाठी गर्दि केल्याचे चित्र पाहावयास मिळाले.याच नदीच्या काठावर असलेल्या वस्तीतील लोकांकडून यापूर्वी ही दोन वेळा दोन ते-तीन मगरीचे एकत्र दर्शन झाल्याचे सांगितले आले.जाणकारांच्या मते मगरी शिकारी साठी किंवा ऊन घेण्यासाठी नदीच्या काठावर येत असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

You cannot copy content of this page