सावंतवाडी बाजारपेठ गर्दीने फुलली

माटवी सामान खरेदीसाठी गणेशभक्तांची गर्दी

*⚡सावंतवाडी ता.०९-:* गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक रिवाजाप्रमाणे गणपतीची माटवी सजविण्यासाठी माटवी सामान खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत आहे.गणेश चतुर्थी एका दिवसावर येऊन ठेपली आहे. बाजारात अगोदरच विविध प्रकारच्या सामानाची रेलचेल वाढली आहे. यात पूजेचे सामान, गणपती सजावटीसाठी लागणारे रंग, मकर, भजनासाठी लागणाऱ्या वस्तू, विविध प्रकारचे पडदे आदी सामान आहे. कोकणात गणेशाची माटवी पारंपरिक रिवाजाप्रमाणे नैसर्गिक फळे, वस्तू वापरून सजविण्याची प्रथा आहे. त्यामुळे गणपतीची माटवी सजविण्यासाठी लागणारे सामान घेऊन तालुक्यातील अनेक गावातील माणसे विक्रीसाठी सावंतवाडी बाजारपेठेत दाखल झाले आहेत. त्यामुळे कवंडळे, कांगले, नागलकुडे, हर्णा, आयन फळे, नरमा आदी विविध प्रकारच्या नैसर्गिक सामानाने बाजारपेठ सजली आहे. लोकही हे सामान खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत.

You cannot copy content of this page