नगरसेवक अँड.परिमल नाईक यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी
*⚡सावंतवाडी ता.०९-:* सावंतवाडी शहरात प्रत्येक प्रभाग निहाय सर्व्हेक्षण करून लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी नगरसेवक तथा नगरपरिषद माजी आरोग्य सभापती अँड.परिमल नाईक यांनी सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या निवेदनात नाईक यांनी म्हटले की, सावंतवाडी शहरात अजूनही बऱ्याच नागरिकांना कोविड- १९ प्रतिबंधात्मक लसीचा लाभ घेता आलेला नाही. लस घेण्यासाठी ऑनलाईन सुविधा प्रणाली असल्याने व लसीकरण व्यवस्थापनेत सुसूत्रीकरण नसल्याने वेळोवेळी नागरिकांना लस घेण्यासाठी पराकष्टा करावी लागते. परिणामी बऱ्याच लोकांना लसीकरणापासून वंचीत रहावे लागत आहे, अशी वस्तुस्थिती पुढे येत आहे. आगामी काळात कोविड विषयक वेगवेगळे प्रकार नव्याने संक्रमित होण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय शास्त्रातील जाणकारांचे अभ्यासाअंती अनुमान आहे. लसीकरणामुळे कोविड- १९ पासुन संरक्षण मिळते हे वैद्यकीय अनुभवातून पुरव्यानीशी शाबीत झालेल आहे. आजच्या घडीला आपल्या जिल्ह्यात मुबलक लस उपलब्ध असल्याची सकारात्मक शासकीय आकडेवारी ध्वनीत होत असताना मात्र नागरिकांना वेळीच लसीच्या पाहिल्या व दुसऱ्या डोसचा लाभ मिळत नाही. त्याकरिता प्रत्येक प्रभाग निहाय सर्व्हेक्षण करून लसीकरण उपक्रम राबवावा व त्या दृष्टीने उपाययोजना आखणी लवकरात लवकर करावी, असे नाईक यांनी म्हटले आहे.
