सावंतवाडी तालुका वकील संघटनेकडून दिवंगत जस्टीस सुनील पंडित वकील अलसुहेब डिंगणकर यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

*⚡सावंतवाडी ता.०८-:* सावंतवाडी शहरातील दिवंगत जस्टीस सुमन पंडित व प्रतिथयश दिवंगत वकिल ॲड. अलसुहेब डिंगणकर यांना सावंतवाडी तालुका वकिल संघटने तर्फे आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी दोघांच्याही आठवणींना उजाळा देण्यात आला.यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, सावंतवाडी श्रीमती आर. आर. बेडगकर मॅडम व सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती डी .बी . सुतार मॅडम, सावंतवाडी तालुका वकिल संघटनेचे अध्यक्ष ॲड.पी. डी. देसाई, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. दिलीप नार्वेकर, ॲड. दीपक नेवगी, ॲड. निता कविटकर, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, अँड. गोविंद बांदेकर, ॲड.अनिल केसरकर, ॲड. कांबळे, ॲड. चुनीलाल आकेरकर, ॲड. वैभव चव्हाण अँड. संदीप निंबाळकर, अॅड राजेश पराडकर आदी वकील उपस्थित होते.

You cannot copy content of this page