मालवण तालुक्यातील मंडळ अधिकाऱ्यांना दिली सूचना
*⚡मालवण ता.०८-:* गणेश चतुर्थी सणानिमित्त असंख्य खातेदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या कालावधीत विशेष बाब म्हणून वारसा हक्क प्रकरणी, वारस तपास नोंदीचे शिबिर आयोजित करण्याची सूचना मालवण निवासी नायब तहसीलदार यांनी मालवण तालुक्यातील मंडळ अधिकाऱ्यांना दिली आहे. हे शिबीर दि. १३, १७ व २१ सप्टेंबर रोजी मंडळ अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात यावे अशा सूचना मालवण, आंबेरी, पेंडूर, सुकळवाड, पोईप, श्रावण, मसुरे, आचरा, कोळंब या मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
