नांदगाव तिठा येथे जन आंदोलन;डॉ.दीपक परब व सुरेश मोरये यांनी केले नेतृत्व
*⚡मालवण ता.०८-:* पनवेल ते झाराप या नियोजित कोकण हायवेच्या निर्मितीमध्ये होत असलेला विलंब, कामाचा निकृष्ट दर्जा,प्रलंबित कामे, नियोजनाचा आणि नागरी सुख सोयींचा अभाव यांचा निषेध नोंदविण्यासाठी कोकण हायवे समन्वय समिती आणि समृध्द कोकण संघटना यांच्यावतीने समृध्द कोकण संघटनेचे संचालक डॉ.दीपक परब आणि मुख्य संयोजक श्री.सुरेश मोरये यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत दरम्यान नांदगाव तिठा येथे जन आंदोलन तसेच आंदोलनानंतर गेल्या ७ – ८ वर्षात कोकण महामार्गावर विविध अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कोकणवासीयांना मानवी साखळीद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ह्या जन आंदोलनामध्ये आणि मानवी साखळी मध्ये समृध्द कोकण संघटनेचे संचालक डॉ.दीपक परब, समृध्द कोकण संघटना आणि कोकण हायवे समन्वय समितीचे मुख्य समन्वयक श्री.उत्तम दळवी आणि ह्या आंदोलनाचे मुख्य संयोजक श्री.सुरेश मोरये उपस्थित होते तसेच स्थानिक नांदगाव समन्वयक समितीचे प्रमुख कार्यकर्ते श्री.पंडित रावराणे,श्री.प्रणय तांबे,श्री.यासीन बटवाले,श्री.दत्ताराम अमृते,श्री.नरेंद्र सावंत,श्री.सुरेंद्र राणे,श्री.सुरेश डामरे तसेच नांदगाव दशक्रोशितील रहिवासी,नांदगाव तिठा येथील व्यापारी,रिक्षा चालक असे सुमारे शंभरच्यावर कोकणप्रेमी उपस्थित होते. यावेळी समृध्द कोकण संघटनेचे संचालक डॉ.दीपक परब यांनी तसेच श्री.उत्तम दळवी यांनी समृध्द कोकण संघटना आणि कोकण हायवे समन्वय समितीची कोकण महमार्गासंबधीची तसेच भविष्यात कोकणात येणाऱ्या इतर इफ्रा स्ट्रक्चर प्रकल्पामध्ये असणारी भूमिका विषद केली. शेवटी आंदोलनाचे मुख्य संयोजक श्री.सुरेश मोरये यांनी आभार मानीत भविष्यात कोकण महामार्गासाठी होणाऱ्या आंदोलनात सर्व कोकणवासीयांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन केले.
