संचालक मंडळाने दिल्या शुभेच्छा
देवगड जामसंडे ग्रुप वि का स सेवा मंडळ ,जामसंडे ,मर्यादित जामसंडे ,कट्टा, इळये ,दाभोळे या संस्थेचे दोन कर्मचारी सर्वश्री लवू घाडी आणि अनिल पाटकर हे काल दि ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले , त्यांच्या सेवनिवृत्तीपर संस्थेचे संचालक मंडळ ,कर्मचारी यांनी त्यांचा निरोप समारंभ केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गोगटे होते ,प्रमुख पाहुणे म्हणून गणपत घाडी होते ,संस्थेचे सर्व आजी -माजी संचालक कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते ,प्रथम संस्थेचे माजी अध्यक्ष ,माजी आमदार स्व.आप्पासाहेब गोगटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली ,संस्थेचे उपाध्यक्ष विश्राम कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले संस्थेने दोन्ही कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान केला त्याचप्रमाणे सु ४० ते ५० वर्षे अखंडपणे सेवा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना संस्थेने सन्मानपत्रही दिले ,देवगड जामसंडे नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यानी दोन्ही कर्मचाऱ्याना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या ,संस्थेचे माजी संचालक श्री गोसावी साहेब यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांनी केलेल्या निस्पुह सेवेचा आढावा घेतला ,संस्थेचे सचिव बाबुराव भुजबळ यांनी आज निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा म्हणून एक कविता सादर केली यावेळी श्री भुजबळ हे संस्थेच्या सेवेत आपल्या सोबत काम केलेल्या आणि आज हयात नसलेल्या कर्मचारी सहकाऱ्यांच्या आठवणीने हेलावले ,आजचे प्रमुख पाहुणे आणि शिक्षकी नोकरी लागण्यापूर्वी रेशन दुकान सेल्समन म्हणून काम केलेल्या मा गणपत घाडी यांनी संस्थेच्या मागील वाटचालीचा आणि रेशन दुकान कामकाजाचा आढावा घेतला ,माजी आमदार स्व आप्पासाहेब गोगटे यांनी रेशन दुकान संस्थेला मिळवण्यासाठी केलेल्या खटपटी आणि एकूणच आप्पासाहेब गोगटे यांच्या संस्थेच्या प्रगतीत असलेल्या योगदाना चा आढावा घेतला ,स्व.आप्पासाहेब यांच्यासारख्या युगपुरुषा सोबत आपल्याला काम करण्याची संधी मिळाली याबद्दल त्यानी परमेश्वराचे आभार मानले. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रकश गोगटे यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आपण आपले कुटूंबीय मानत असल्याचे सांगून आपण लहान असताना पासून असलेल्या या कर्मचाऱ्यांनी आपले खूप लाड केले ,आपण लहानाचे मोठे या सोसायटी कर्मचाऱ्यांच्या सान्निध्यात झालो ,त्यामुळे हे दोन कर्मचारी आज निवृत्त होत असल्याने प्रकाश गोगटे भाषण करताना खूप भावुक झाले ,स्व आप्पासाहेब हे जनता जनार्दन असल्याने गावात कोणाकडे लग्न किंवा इतर समारंभ असला की ती व्यक्ती स्व आप्पांकडे रेशन वरील धान्य अधिक मिळण्यासाठी विनंती करीत असत ,कारण दुकानात मिळणारा तांदूळ खरेदी करण्याची त्याची ऐपत नसे ,अशा वेळी स्व आप्पासाहेब लवू घाडी याना सदर व्यक्तीला अधिक धान्य देण्यास सांगत असत ,अशावेळी हिशोबतले घोडे रंगवावे लागत असत आणि हे काम लवू घाडी चोख करीत असत ,अर्थात यामागे त्या व्यक्तीच्या घरातील कार्यक्रम सुरळीत होण्यास मदत करणे हा उद्देश असायचा आणि तेव्हा असलेल्या वितरण पद्धतीत ते शक्य होते आता माणशी प्रमाण आणि ऑनलाइन प्रक्रियेत या गोष्टी शक्य नाहीत असे सांगून प्रकाश गोगटे यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या घाडी आणि पाटकर यांच्या कुटूंबियांचे आभार मानले ,तसेच उपस्थित ग्रामस्थांचे नावानिशी आभार मानले त्याचप्रमाणे सर्व माजी संचालक ,आजी संचालक ,कर्मचारी यांचे आभार मानून लवू घाडी आणि अनिल पाटकर याना निवृत्तीनंतर ही संस्थेला आवश्यक असेल त्यावेळी सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याची विनंती करून सर्वाना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी जि प सदस्य रेश्मा जोशी यांनी केले ,संचालक मा धर्मराज जोशी यांनी आभार प्रदर्शन केले आणि राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली
