बाल विकास सेवा योजनेप्रमाणे राष्ट्रीय पोषण माह अभियानात मालवण तालुका आदर्शवत काम करेल

सभापती अजिंक्य पाताडे यांचे प्रतिपादन

मालवण दि प्रतिनिधी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मालवणचे काम नेहमीच दर्जेदार राहिले आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीय पोषण माह अभियानातही मालवण तालुका आदर्शवत काम करेल. असे प्रतिपादन मालवणचे सभापती अजिंक्य पाताडे यांनी येथे बोलताना केले. राष्ट्रीय पोषण माह १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या अभियानाचा शुभारंभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मालवणच्या मेढा येथील कार्यालयात बुधवारी करण्यात आला यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी कौमुदी रसाळ-पराडकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर यासह मुख्य सेविका स्नेहा सामंत, स्नेहल गावडे, उल्का खोत, रत्नावली कदम, मंगल जंगले, सहायक संरक्षक अधिकारी रंजन कोळंबकर, बबन भिसे, प्रवीण वस्त, प्रवीण परब यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. यावेळी उपसभापती राजू परुळेकर यांनी कमी पगारात जास्त काम करणाऱ्या सेविका म्हणजे अंगणवाडी सेविका आहेत. असे असतानाही आपले काम त्या कर्तव्यनिष्ठपणे बजावत असतात. त्यांच्या मानधनात राज्य सरकारने भरीव वाढ करावी. असे मत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. फोटो : राष्ट्रीय पोषण माह अभियानाचा मालवण येथे शुभारंभ करताना सभापती अजिक्य पाताडे सोबत राजू परुळेकर,राजेंद्र पराडकर, जयेंद्र जाधव व इतर

You cannot copy content of this page