भाजपाचे आव्हान शिवसेनेने स्वीकारले

किंजवडेकर यांनी वेळ, तारीख ठरवावी;सेना शहर अध्यक्ष संतोष तारी

देवगड देवगड तालुका भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी शिवसेनेला दिलेले आव्हान शिवसेनेने स्वीकारले असून त्यांनी आमने सामने येण्याची वेळ,तारीख,दिवस जाहीर करावा. देवगड शिवसेना केव्हाही तयार आहे .असे प्रति आव्हान शहर प्रमुख संतोष तारी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले. देवगड तालुका शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी तालुका प्रमुख मिलिंद साटम,उपतालुकप्रमुख,निवृत्ती तारी, युवा सेना प्रमुख निनाद देशपांडे,माजी सभापती रवींद्र जोगल,विभाग प्रमुख तुषार पेडणेकर उपस्थित होते. या पुढे बोलताना ते म्हणाले,भाजप तालुका अध्यक्ष यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद न घेता उपसभापती दालनात पत्रकार परिषद घेऊन अधिकारी वर्गाची पाठराखण करणे चुकीचे आहे.विधानपरिषदेत माजी मुख्यमंत्री यांनी गुन्हेगारीचा पाढा वाचला होता त्यामुळे गुंडगिरी कुणाची आहे हे किंवजडेकर याना ज्ञात आहे.असे सांगून जनाशीर्वाद यात्रेला भाजपला मुंबई हुन पार्सल आणावे लागले हे यात्रेत दिसून आले आहे उलट शिवसेनेने पोलीस यंत्रणेचा वापर करून निदर्शने केली असे नाही तर शिवसेनेमुळे भाजप मोठी झाली आहे आणि शिवसेनेच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रशासनाला दोन गाड्यांचा बंदोबस्त द्यावा लागला यावरून शिवसेनेची ताकद दिसून येते,त्यामुळे भाजपचे आव्हान आपण स्वीकारले आहे.त्यांनी तारीख, वेळ,ठिकाण ठरवावे .सिंधुदुर्ग जिल्ह्यात मक्तेदारी शिवसेनेची आहे की भाजपची आहे हेही त्यांना ज्ञात आहे.भाजप कार्यालयावर अंडा फेक झाली तेव्हा ही भाजप मंडळी कोणत्या बिळात लपून बसली होती हे ही किंजवडेकर यांनी स्पष्ट करावे असेही श्री तारी यांनी सांगितले.

You cannot copy content of this page