तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी घेतली भेट
*⚡देवगड ता.०१-:* देवगड तालुका मनसे तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी नूतन पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे तसेच देवगड नूतन पोलीस उपनिरीक्षक शेखर सावंत यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी उपतालुका अध्यक्ष राजा मोंडकर,विभाग प्रमुख परेश आडकर,गणेश सागवेकर उपस्थित होते. या वेळी देवगड निपाणी रस्त्यावरील काही भागाचे काम अर्धवट असून संपूर्ण रस्त्याचे कामही पूर्णत्वास न जाता काही भागात रस्त्यात खड्डे पडले आहेत.ते खड्डे बुजविण्याकरिता शासनाकडे निधी नसून त्यासाठी ३सप्टेंनबर रोजी देवगड शहरात भीक मागे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले व सविस्तर चर्चा केली.
