बांदा केंद्रशाळेत आलेल्या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले

*⚡बांदा दि.०१-:* येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत सातवीच्या वर्गात अचानक नाग शिरल्याने शिक्षकांसह सर्वांची तारांबळ उडाली. सर्पमित्र राजा खान यांनी शिताफीने सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. २३ जुलै रोजी आलेल्या महापुरात केंद्रशाळेत पुराचे पाणी शिरले होते. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सातवीच्या वर्गात नाग शिरला. यावेळी वर्गशिक्षिका उर्मिला मोर्ये व काही विद्यार्थी उपस्थित होते. अचानक साप शिरल्याने सर्वांची तारांबळ उडाली. मुख्याध्यापक सरोज नाईक व शिक्षक जे डी पाटील यांनी याची कल्पना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांना दिली. त्यांनी सर्पमित्र राजा खान यांना शाळेत बोलाविले. खान यांनी शिताफीने नागराजला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. यावेळी प्रशालेत शिक्षक उपस्थित होते.

You cannot copy content of this page