अन्यथा आम्ही मंदिरे उघडू: आम.नितेश राणेंचा इशारा

शिवसेना आम.भास्कर जाधव यांच्या मुलावर गुन्हा दाखल करा

*⚡कणकवली ता.३०-:* एका बाजूला राज्य सरकार सामान्य जनतेसाठी मंदिरे बंद ठेवत आहे. कोरोना होईल अशी कारणे देत आहे, असे असताना शिवसेनेच्या आमदारांची मुले जर मंदिरात अभिषेक करत असतील तर सामान्य जनतेने नेमकी काय चूक केली आहे? याचे उत्तर ठाकरे सरकारने द्यावे असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले आहे. त्यामुळे आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर एकतर गुन्हा दाखल करावा अन्यथा जनतेच्या न्याय हक्कासाठी भाजपा मंदिरे सुरू करण्यासाठी पुढाकार घेईल असा इशाराही राणे यांनी दिला आहे. सत्ताधारी आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा मंदिरामध्ये अभिषेक करत असतानाचा एक व्हिडिओ आमदार नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे. त्या व्हिडिओमध्ये भास्कर जाधव यांचे सुपुत्र व त्यांचे कुटुंबीय असल्याचे दिसत आहे. याच व्हिडिओचा आधार घेत राणेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

You cannot copy content of this page