*⚡सावंतवाडी दि.३०-:* सावंतवाडी तालुक्यात आज ८ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात जुना बाझार येथे एक तर ग्रामीण भागात इन्सुली, निरवडे, शिरशिंगे येथे प्रत्येकी एक – एक आणि नेमळे येथे चार असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ९७ रुग्ण सक्रिय आहेत.
