*⚡कणकवली ता.२८-:* सिंधुदुर्गात लागलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आ. नितेश राणे, शिवसेना आ. वैभव नाईक, निलेश राणे यांच्यासह ६०- ७० शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १९५१ चे कलम १३५, भादवि कलम १८८, १४३ नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कणकवलीत काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा दाखल झाली. मंत्री राणे यांचे स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली होती. तसेच नरडवे नाका येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी करत घोषणाबाजी केली होती. त्यामुळे शिवसेना १७ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, नगरसेवक कन्हैया पारकर यांच्यासह कुडाळ, मालवण व कणकवली तालुक्यातील अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे,माजी खासदार निलेश राणे, माजी जि. प. उपाध्यक्ष संदेश सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, सभापती मनोज रावराणे, संतोष कानडे, बाळा जठार, राकेश परब, दिलीप तळेकर, संदीप मेस्त्री, अण्णा कोदे यांच्यासह ४० ते ५० भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
जमावबंदी आदेश उल्लंघन ; नितेश राणे, वैभव नाईक, निलेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे
