जन आशीर्वाद यात्रेस सुरुवात
*⚡कणकवली ता.२८-:* कणकवलीत केंद्रीयमंत्री नाम.नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे उत्साही स्वागत झाल्यानंतर आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.तत्पूर्वी कणकवली बसस्थानक समोरील आपल्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जन आशीर्वाद सुरुवात केली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर,आम.आशिष शेलार,आम.नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत,नगराध्यक्ष समीर नलावडे, निलमताई राणे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गणेश तांबे, मिलिंद मेस्त्री ,सुरेश सावंत,नगरसेवक संजय कामतेकर,नगरसेविका मेघा गांगण,मेघा सावंत, प्रतिक्षा सावंत,प्राची कर्पे,साक्षी वाळके,बबलू सावंत,किशोर राणे,संदीप मेस्त्री यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते.
