*⚡कणकवली ता.२८-:* युवा फोरम भारत संघटनेने चौथ्या वर्षात पदार्पण केले असून युवा फोरम भारत संघटनेचा तिसरा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या वेळेस युवा फोरम भारत संघटनेच्या मुख्य कार्यालयाचे उदघाटन परुळेकर यांच्याहस्ते करण्यात आले. या वेळेस संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे, उपाध्यक्ष अमोल निकम, सचिव ऍड. हितेश कुडाळकर, पूजा खानोलकर, सिद्धी सावंत, भूषण मेस्त्री, संकेत राणे, गणेश सावंत व इतर स्वयंसेवक उपस्थित होते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा जुदो कराटे आकिदो असोसिएशन सावंतवाडी यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे समाजमंदिरमध्ये स्वसंरक्षणचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा जुदो कराटे आकिदो असो. सावंतवाडीचे मुख्य प्रशिक्षक, संस्थापक व सचिव वसंत जाधव , प्रशिक्षक – प्रतीक्षा गावडे , प्रशिक्षक – संदेश पंडित व युवा फोरम भारत संघटनेचे स्वयंसेवक हर्षल देसाई, अनुप जाधव, हार्दिक कदम, प्रतिक्षा कोंडस्कर, विपुल भावे, सौरभ शिरसाट, हेमंत, श्रेयश, निधी जोशी, भूषण अनावकार, सुयश घाटकार, सिद्धार्थ वर्डम व इतर स्वयंसेवक उपस्थित होते. त्यानंतर काळसे येते युवा फोरम भारत संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आला होता. या वेळेस डॉ.बेळनेकर, डॉ. जोशी, डॉ. कलांबलेकर, व युवा फोरम भारत संघटनेचे स्वयंसेवक मिली मिश्रा, श्रीशा बांदिवडेकर, विनोद निकम, केतन शिरोडकर, वेदान्त नवंगुल, रोहित अटक, भूषण गावडे, विवेक राजमाने, गौरव पालव, विराज चिंदरकर, राधाकृष्ण भोगते, शुभम सिंदगीकर व इतर स्वयंसेवक उपस्थित होते.
युवा फोरम भारत संघटनेचा तिसरा वर्धापनदिन साजरा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
