शिक्षणमहर्षी आबासाहेब तोरसकर यांना कुडासेत श्रध्दांजली

*⚡दोडामार्ग ता.२८ सुमित दळवी-:* धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष शिक्षणमहर्षी,शिक्षणभूषण कै.आबासाहेब तोरसकर यांना सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि.काॅलेज सायन्स,कुडासे ता.दोडामार्ग या प्रशालेत श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक,शालेय समिती सदस्य सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी श्रध्दांजली वाहिली प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील,सहा.शिक्षक ए.आर.तारी, तर क्रीडाशिक्षक एस.पी.गोंधळी यांनी आबासाहेबांच्या जीवनातील आठवणीना उजाळा दिला. शिक्षण क्षेत्रातील महर्षी हरपल्यामुळे या भागातील शिक्षणक्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे मत मुख्याध्यापक पाटील यांनी व्यक्त केले.प्रशालेचे मुख्याध्यापक यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page