जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढली

शिक्षण समिती सभेत झाले स्पष्ट

*⚡ओरोस ता.२३-:* कोरोना काळात जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्याचा ओढा वाढला आहे. ३७४ खाजगी शाळांतील ११३३ मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली आहेत, अशी माहिती सोमवारी झालेल्या शिक्षण समिती सभेत देण्यात आली. यावेळी सभागृहाने समाधान व्यक्त करीत यापेक्षा पटसंख्या जिल्हा परिषद शाळांची वाढली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती डॉ अनिशा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा सचिव एकनाथ आंबोकर, सदस्य सरोज परब, विष्णुदास कुबल, सुधीर नकाशे, संपदा देसाई, वर्षा कुडाळकर यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कोरोना काळात जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढली का ? असा मागील सभेला विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आंबोकर यांनी जिल्ह्यातील ५५२ शाळांतील विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे. तर ३५६ शाळांत घट झाली आहे. बाकीच्या शाळांतील विद्यार्थी संख्या स्थिर आहे, असे सांगितले. तसेच सेतू अभ्यासक्रमाच्या तीन चाचण्या झाल्या असून यातील दोन चाचणीचा निकाल जाहीर झाला आहे, असे सांगितले.

You cannot copy content of this page