युवकावर गुन्हा दाखल
देवगड-प्रतिनिधी मिठबांव येथे कल्याण मटका जुगाराचा खेळ खेळताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग यांनी एका 45 वर्षीय युवकास रंगेहाथ पकडुन त्याच्या जवळील 4 हजार 100 रुपये रोख व मटका जुगाराचे साहित्य् जप्त करुन देवगड पोलीस ठाण्यामध्ये मटका जुगार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई हि सोमवारी दुपारी 2 वा. च्या सुमारास करण्यात आली आहे. मिठबांव येथे कल्याण मटका जुगार खेळला जात असल्याची खबर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग यांना मिळाली होती. यावरुन सोमवारी त्यांनी मिठबांव येथे मिळालेल्या माहिती नुसार सापळा रचून गणेश दिगंबर केळुस्क्र हे जुगार खेळत असताना अचानक धाड टाकून त्याला रंगेहाथ पकडले आहे. त्याच्या जवळील मटका जुगाराची 4 हजार 100 रुपये व मटका जुगाराचे साहित्य् जप्त केले आहे. सदरची फिर्याद देवगड पोलीस स्थानकामध्ये संकेत खाडये, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्गचे यांनी दिल्यावरुन देवगड पोलीसांनी सदर केळुस्कर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्गचे पोलीस उपनिरिक्षक शाहू देसाई,सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बाबू शेळके,हवालदार केसरकर यांनी केली आहे. अधिक तपास देवगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक दशरथ चव्हाण करीत आहेत. दोन दिवसांपुर्वीच देवगड दौ-यावरती आलेले पालकमंत्री यांनी देवगड शासकिय विश्राम गृहावरती सर्व कर्मचा-यांची आढावा बैठक् घेतली होती. यावेळी देवगड मधील दारुधंदे व मटकावरती आळा घालण्यात यावा असे सक्त आदेश देवगड पोलीस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांना देण्यात आले होते. तसेच जिल्हयामध्ये दारुधंदे बंद झाले पाहिजेत असे फोनव्दारे जिल्हा पोलीस अधिक्षक यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी आदेश दिले होते. यावरुन देवगड मध्ये दारुधंदे व मटक्यावरती छोटयाछोटया कारवाई केल्या जात आहेत. पण मोठया दारुधंदे व्यावसायिकांवरती कारवाई केली पाहिजे. असा हि सुर जनतेमधून उमटत आहे.
