सागररत्न मत्स्य बाजारपेठेतील “त्या” 15 ही व्यापाऱ्यांना गाळे मिळावेत

व्यापारी संघाचे मुख्याधिकारी यांना निवेदन : …अन्यथा आत्मदहन आंदोलनाचा इशारा

*⚡वेंगुर्ला ता.२३-:* जुना ई लिलाव रद्द करून ज्यांनी ज्यांनी ई लिलावात भाग घेतला त्यांची अनामत व ई लिलाव फी परत करून नविन संपूर्ण प्रक्रिया राबवावी, मंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासू नयेत तसेच जुन्या त्या 15 गाळेधारकांना त्याच जागेत शासनाच्या नियमानुसार गाळे देऊन सहकार्य करावे. अन्यथा आम्हाला आत्मदहन आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल व त्यास सर्वस्वी आपण जबाबदार रहाणार, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे आज सोमवारी वेंगुर्ला तालुका व्यापारी संघातर्फे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांना देण्यात आला आहे. वेंगुर्ले नगर परिषदेच्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेच्या तळमजल्यावरील १५ दुकान गाळ्यांच्या ई-लिलाव संबंधी आज व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी डॉ. सोंडगे व नगराध्यक्ष दिलीप गिरप यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच आपल्या मागणीचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले. नगरपरिषद प्रशासनाने २०/०८/२०२१ ते ०३/०९/२०२१ पर्यंत ई लिलाव फि रु. १०००/- व अनामत रक्कम रु. ५००००/- (पंनास हजार मात्र) व अटि-शर्ती मान्य करून ई-लिलावामध्ये भाग घेण्याचे आव्हाहन केले आहे. परंतु दि. ०६/०८/२०२१ रोजी श्री. एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉलवर झालेल्या बैठकीत आपणांस जुलै मधील ई-लिलाव रद्द करण्याचे आदेश दिले होते. परंतु सदर आदेशाचे आपलेकडून उल्लंघन केल्याचे निदर्शनास येत आहे. विकासाच्या नावाखाली त्या 15 गाळेधारकांनी आपले गाळे खाली केले होते. त्यावेळी उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागली. मात्र त्या खोलात आम्हाला जायचे नाही. ते 15 ही व्यापारी स्थानिक असून त्यांना पुन्हा गाळे मिळावेत ही आमची मागणी आहे. नियमानुसार अटी व शर्ती ना अधीन राहून ते गाळे घेणार आहेत. तसेच नगरपालिका म्हणजे फायद्याचा विचार करणारा बिल्डर नाही ती एक स्वराज्य संस्था आहे. त्यामुळे आपल्या नागरिकांचा आपणच विचार करावा अशी मागणी यावेळी व्यापारी यांचे वतीने करण्यात आली. यावेळी वेंगुर्ला तालुका व्यापारी संघ अध्यक्ष विवेक खानोलकर, व्यापारी संघ जिल्हा प्रतिनिधी श्री राजेश शिरसाट, वेंगुर्ले व्यापारी सदस्य – राजन गावडे, अमर दाभोलकर, श्रीनिवास सौदागर, राजू पागम, लक्ष्मण दिपनाईक, किशोर परब, शाम शेख, संजय तानावडे, भाऊ सातार्डेकर, श्रीपाद सामंत, सदानंद नवार, कादर दोस्ती, बाबा शिरसाठ, संदीप मोरे,काका खोबरेकर, जयंत मोडकर बाप्पा कोरगांवकर, राकेश सापळे, प्रभाकर आजगांवकर, दिपू वराडकर,बाबाजान मकानदार, जहीर शेख, सदा गिरप, उपेंद्र तोटकेकर, सदानंद पांजरी, संदीप गावडे, समाधान बांदवलकर, बाबा आरावंदेकर, राजेश शारबिदे, शैलेश गवंडे, विजय गावडे, सुधिर वाडकर, अतुल नेरुरकर,गौरेश कोरगांवकर, गजा परब, सौरभ पांजरी, अमेय खानोलकर, निलेश वाडकर, महेश प्रमुखानोलकर, सचिन पारकर, संदीप दिपनाईक आदींसह अन्य व्यापारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page