मुसळधार पावसामुळे कणकवलीत 12 घरांचे नुकसान;

5 जनावरे वाहून गेली

*💫कणकवली दि.२२-:* कणकवली तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत बारा घरांचे नुकसान झाले आहे तर पाच जनावरे वाहून गेली आहेत. तसेच दुकाने व इतर आस्थापनांचे ही नुकसान झाले असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली. महसूल विभागाकडून प्राप्त माहितीनुसार कातकरी समाजाच्या तिने झोपड्या पूर्णता उध्वस्त झाले असून त्यातील 22 लोकांच्या स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे तूर्त त्यांची मंदिराची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील 13 ठिकाणी पाणी आल्यामुळे वाहतूक बंद होती यात आचरा, नागवे फोडा नांदगाव लोरे वागदे कसवन सांगवे नरडवे रस्ता आदींचा समावेश आहे.

You cannot copy content of this page