*💫कणकवली दि.२२-:* शहरात निमेवाडी येथे गवळदेव जवळ झोपडी बांधून राहणाऱ्या ७ कातकरी कुटुंबातील सुमारे २२ कातकरी बांधवांना कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी गृहपयोगी साहित्य वाटप केले. कातकरी बांधवांच्या तीनही झोपड्या पुराच्या पाण्यात बुडाल्याने या कातकरी बांधवांचे जीवनावश्यक व गृहोपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी तात्काळ या कातकरी बांधवांना चटई, बेडशीट, चादर असे साहित्य नगरपंचायत मार्फत तात्काळ सुपूर्द केले. यावेळी आरोग्य सभापती अभिजीत मुसळे, नगरपंचायत कर्मचारी मनोज धुमाळे, प्रशांत राणे उपस्थित होते. या माणुसकीबद्दल कातकरी बांधवांनी मधून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले .
नगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी अवधुत तावडे यांच्याकडून कातकरी बांधवांना गृहपयोगी साहित्य वाटप
