मुसळधार पावसामुळे आंबोली मुख्य धबधब्याजवळ कोसळली दरड…

सावंतवाडी-बेळगाव-कोल्हापूर मार्ग ठप्प:;माडखोल धवडकी परिसरात घरात घुसले पाणी_

*💫सावंतवाडी दि.२३ प्रसन्न गोंदावळे-:* मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गावर आंबोली मुख्य धबधब्याजवळ भली मोठी दरड कोसळल्याने सावंतवाडी-बेळगाव व कोल्हापूर मार्ग ठप्प झाला आहे. गेले चार दिवस मुसळधार सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे माडखोल धवडकी दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिसरातील घरात पावसाचे पाणी घुसले आहे. तसेच पावसामुळे आंबोली धबधब्यपासून दीड किलो मीटरच्या अंतरावर रात्री १.३० सुमारास दरड कोसळली असल्याचे माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली आहे. त्यामुळे आंबोली-सावंतवाडी हा राज्यमार्ग ठप्प झाला आहे.

You cannot copy content of this page