जीवनावश्यक वस्तूंची मदत करीत दाखविली सामाजिक बांधिलकी
*💫कणकवली दि.२२-:* गेले सहा दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच, गुरुवारी सकाळी झालेल्या ढगफुटीमुळे कणकवली शहरात निमेवाडी येथे गवळदेव जवळ झोपडी बांधून राहणाऱ्या 7 कातकरी कुटुंबातील सुमारे 22 कातकरी बांधवांचा निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. झोपड्या बांधून राहत असलेल्या कातकरी बांधवांच्या झोपड्यांमध्ये पाणी घुसले. व त्यांचे जीवनावश्यक साहित्यासह अनेक गृहोपयोगी वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.त्यामुळे शिवसेना कणकवली शहर यांच्यावतीने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविण्यात आले. या कातकरी समाजातील कुटुंबांना मदतीचा हात शिवसेनेने पुढे केला आहे.कणकवली नगरपंचायतचे गटनेते सुशांत नाईक यांच्या पुढाकारातून कणकवली शहर शिवसेनेच्यावतीने या कातकरी बांधवांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. या कातकऱ्यांचा पुरा संसारच पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने कणकवली शिवसेनेने अशा अडचणीच्या काळात या कातकरी बांधवांना मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. याबद्दल कातकरी बांधवांकडून देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले. या साहित्या मध्ये तांदूळ, बटाटे, यासह अन्नधान्य देत कातकरी बांधवांना शिवसेनेने दिलासा दिला आहे. यावेळी शिवसेना नगरपंचायत गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, अमित मयेकर, वैभव मालडकर, सुरज सुतार, गुरुप्रसाद गोळवनकर, पपु पेंडुरकर, तुषार गोळवणकर आदी उपस्थित होते. आपत्कालीन परिस्थितीत शिवसेना नेहमीच मदतीसाठी तत्पर राहिली आहे.कातकरी बांधवावर ओढवलेल्या संकटावेळी मदतीचा हात देत शिवसेनेने सामाजिक बांधीलकी दाखविल्याबद्दल कातकरी बांधवांनी आभार व्यक्त केले.
