पाळये गावठाणवाडीतील तरुणाची घरात गळफास लावून आत्महत्या

*💫दोडामार्ग दि.१३-:* पाळये गावठाण वाडी येथील एका इसमाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सबंधित इसमाची मानसिक स्थिती बरी नव्हती. त्यातच त्याने सोमवारी रात्री उशिरा पत्नी व मुलांना मारहाण करून घराबाहेर काढले होते व तो घरात एकटाच होता. मंगळवारी दुपारी ३ वा. सुमारास त्या इसमाने घराच्या वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. साटेली-भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पी. एन. नाईक करत आहेत अशी माहिती पोलिस निरीक्षक आर. जी. नदाफ यांनी दिली.

You cannot copy content of this page