सॅनिटायझर करण्यासाठी दिलेली ‘ती’ कार पोलिसांच्या ताब्यात

गुन्हा दाखल होताच यंत्रणा लागली कामाला

*💫मालवण दि.१३-:* सॅनिटायझर करण्यासाठी दिलेली कार परत केली नसल्याच्या कारणावरून मालवण पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर आज या प्रकरणातील संबंधित कार मालवण पोलिसांनी तपासाअंती २४ तासाच्या आत ताब्यात घेतली असल्याची माहिती मालवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण यांनी दिली आहे. सॅनिटाईज करण्यास दिलेली कार संबंधितांने परस्पर दुसऱ्या व्यक्तीकडे दिल्यानंतर वारंवार कार परत देण्याची मागणी करूनही संबंधित व्यक्ती कार देत नसल्याने अरुणा भालचंद्र कोळंबकर (रा.भरड मालवण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार किशोर दशरथ खानोलकर (रा. एसटी स्टँड मार्ग मालवण) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ४०६ नुसार रविवारी रात्री उशिरा मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकणातील सुझुकी XL6 (क्र. एम.एच.०७ ए एच ४४८८) ही कार मालवण पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक एस एस ओटवणेकर अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page