*💫मालवण दि.११-:* मालवण तालुक्यातील पेंडूर गावचे माजी सरपंच संजय नाईक यांच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय अपंग विकास महासंघ व काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काळसे, धामापूर गावातील दहा दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी बाळासाहेब पाटील, विनोद धुरी, अनिल पाटील, विनायक चव्हाण, दादा वायंगणकर, दिव्यांग सखी, उर्मिला चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
काळसे, धामापूर येथील दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
