प्रदर्शनापूर्वीच ‘नांदोस’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

नावाला नांदोस ग्रामस्थांचा प्रखर विरोध;मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मागितली दाद

*💫मालवण दि.११-:* अठरा वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या नांदोस हत्याकांडावर आधारित रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनी तयार केलेला नांदोस चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाच्या नावावरून वादाच्या भोवऱ्यात सापडला असून या विषयाला मालवण तालुक्यातील नांदोस ग्रामस्थांनी प्रखर विरोध केला आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे सचिन चव्हाण यांची नांदोस माजी सरपंच हेमंत माळकर, माजी उपसरपंच नंदू करावडे यांच्यासह ग्रामस्थांनी मनसे पदाधिकाऱ्यांनी भेट घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दरबारात दाद मागितली आहे संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या नांदोस हत्याकांड प्रकरणावर चित्रपट तयार केला आहे. आणि त्या चित्रपटाला ‘नांदोस’ हे नाव दिले आहे. या विषयाला मालवण तालुक्यातील नांदोस ग्रामस्थांनी प्रखर विरोध केला आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे सचिन चव्हाण यांची नांदोस माजी सरपंच हेमंत माळकर, माजी उपसरपंच नंदू करावडे, भिकाजी गावडे, गणेश पारकर, शिवसेना शाखाप्रमुख राजू गावडे, सुधीर पार्टे यांनी भेट घेत चित्रपटाच्या नावाला गावाचा पूर्ण विरोध असल्याचे सांगितले. त्यावेळी चव्हाण यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या माध्यमातून आपण हा प्रश्न निश्चितच सोडवू असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. नांदोस हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नांदोस गावची प्रतिमा मलीन झाली होती. नोकरीनिमित्त मुंबई, पुणे यांसारख्या शहरात गावातील अनेक तरुण-तरुणी वास्तव्यास आहेत. त्यांच्यासाठी ही बाब शरमेची झाली होती. आज कटू आठवणी मागे टाकून गाव गुण्यागोविंदाने नांदत आहे. त्या हत्याकांडाच्या आठवणी पुन्हा या चित्रपटाच्या माध्यमातून जाग्या होऊन गावच्या आनंदावर विरजण पडू नये, यासाठी चित्रपटाचे नाव बदलावे, अशी मागणी माजी सरपंच हेमंत माळकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page