माजी आम.प्रमोद जठार यांनी वाहिली श्रद्धांजली
*💫कणकवली दि.११-:* पहाटे ४ वा. नानिवडेकराच्या मुलीचा फोन आला बाबांना बरेवाटत नाही, मी कोल्हापूर वरुन निघाले आहे, त्यानंतर ७ वा. कासार्ड्यातील माझ्या बहिणीचा फोन येईपर्यंत मी देवाचा धावा करत होतो परंतु शेवटी ती दुख्खद , अप्रिय बातमी कळलीच . मधुसुदन नानिवडेकर यांच्या किती आठवणी सांगु पानंच्या पानं भरतील असा सज्जन माणुस पुढील १०० वर्षे होणे नाही त्यांना माझ्या कोकणाच्या व सिंधुभुमि कला अकादमीच्यावतीने भावपुर्ण श्रद्घांजली असे उद्गार भाजपचे प्रदेश सचिव माजी आम.प्रमोद जठार यांनी मधुसुदन नानिवडेकर यांच्या निधनानंतर काढत शोक व्यक्त केला. मधुसुदन नानिवडेकर एक व्यक्ती पण अविष्कार अनेक – उत्तम पत्रकार – पुढारी, रत्नागिरी टाईम्स ते महाराष्ट्र टाईम्स – अचुक व मोजकेच लिहीणारा – कवी -गझलकार – स्व. सुरेश भटांची २० वर्षांची सोबत त्यामुळे गझललेखनावर प्रभुत्व – लेखन – सिंधुदुर्गातील साहित्यीकांवर पुस्तक प्रकाशन, अनेक नवोदित , धडपडणाऱ्या लेखकांची पुस्तके प्रकाशनांची जिद्द -कवी नारायण सुर्वेंचे हेत गावात स्मारक करण्यासाठी शिल्पकार नामानंद मोडकांसोबत धडपडणारा साहित्यीक कार्यकर्ता – मला सिंधुदुरगातिल साहित्यीक विश्वाची ओळख करुन देणारा एक अवलिया -माझ्या सिंधुदुर्गातील वाचनीय ठरणाऱ्या सर्व प्रेसच्या बातम्यांचे मुळ अधिष्ठान -सिंधुभुमी कला अकादमी सुरु करण्यामागचे प्रेरणास्थान व त्या अकादमीची प्रमुख कार्यवाह म्हणुन स्विकारलेली जबाबदारी -सिंधुदुर्गात कवीवर्य कै विष्णु वाघ , कवी अरुण म्हात्रे, गझलकार भिमराव पांचाळे , रामदासजी फुटाणे ,कविवर्य नायगांवकर यांच्या सोबत परिचय त्याच्य रंगलेल्या महफिली – मालवणी बोली साहित्य संमेलनाची तयारीची घेतलेली जबाबदारी , गंम्मत म्हणुन नानिवडे गावचे झालेले सरपंच व ते आपले काम नाही – गड्या आपल्या कवीता गझलांचा गांव बरा म्हणणारे – सर्वात कळस म्हणजे मला आग्रहाने चिपळुनच्या अभा मराठी साहित्य संमेलनात करायला लावलेले “राजकारणी काय व का वाचतांत “ यावरील भाषण किती आठवणी सांगु पानंच्या पानं भरतील असा सज्जन माणुस पुढील १०० वर्षे होणे नाही त्यांना माझ्या कोकणाच्या व सिंधुभुमि कला अकादमीच्यावतीने भावपुर्ण श्रद्घांजली वाहत असल्याचे प्रमोद जठार म्हणाले.
