सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ९ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.११ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात बाहेरचा वाडा १, तर ग्रामीण भागात चराठा ४, मळगाव १, बांदा १, आंबोली २ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात २४२ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page