राज्यस्तरीय कथा कथन स्पर्धेत दाणोली गावठण शाळेची सानिया शिदलाळे द्वितीय

पार्थ गारमेंट व मंथन पब्लिसिटी लिमिटेडचा उपक्रम

*💫सावंतवाडी दि.११-:* लोकराजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने 26 जुन रोजी पार्थ गारमेंट व मंथन पब्लिसिटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या खुल्या ऑनलाईन राज्यस्तरीय कथा कथन स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा, दाणोली गावठण ता.सावंतवाडी या शाळेची विद्यार्थिनी कु. सानिया सिकंदर शिदलाळे हिने द्वितीय क्रमांक पटकावला तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. या स्पर्धेत राज्यभरातून अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता लोकराजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने पार्थ गारमेंट व मंथन पब्लिसिटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने हि ऑनलाईन राज्यस्तरीय कथा कथन स्पर्धा घेण्यात अली होती स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा, दाणोली गावठण ता.सावंतवाडी या शाळेची विद्यार्थिनी कु. सानिया सिकंदर शिदलाळे हिने द्वितीय क्रमांक पटकावला तिला शाळेतील शिक्षकांचे व पालकांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. सानियाने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page