शिवसेनेविरूद्ध लढू शकत नाही याची खात्री पटल्याने भाजपने केंद्रात राणेंना मंत्रीपद दिले

खास. विनायक राऊत यांचा उपरोधिक टोला

*💫सावंतवाडी दि.०९-:* महाराष्ट्रासह आपण कोकणात शिवसेने विरूद्ध लढू शकत नाही याची खात्री पटल्याने भाजपने केंद्रात राणेंना मंत्रीपद देऊन यापूर्वी काही राजकर्त्यांनी जो प्रयोग केला तोच प्रयोग भाजप करत आहे. अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मळगाव येथे शालू हॉटेल मध्ये आयोजित केलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघ शिवसेना संपर्क अभियान शुभारंभ कार्यक्रमात बोलताना केली आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, तुम्ही कितीही ईडी लावा तुमची ईडी संपेल पण सरकारला फरक पडणार नाही. केंद्र सरकारने महाविकास आघाडी मधील खासदार आणि आमदार यांच्या मागे ईडी लावली तरी महाविकास आघाडी सरकारला धक्का लावू शकणार नाही. असा इशारा यावेळी खासदार राऊत यांनी दिला आहे. ३५६ चा वापर करून महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याचा डाव भाजपने आखला होता. परंतु, हे सरकार हीच पाच वर्ष नाही तर त्या पुढील पाच वर्ष पण राहील असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी माजी गृहराज्यमंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हा संघटक जानवी सावंत, जि प गटनेते नागेंद्र परब, जिल्हा प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर, मतदार संघ प्रमुख विक्रांत सावंत, रुची राऊत, तसेच सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, दोडामार्ग तालुका प्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, गणेश प्रसाद गवस, प्रेमानंद देसाई, युवा सेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर, बाळा दळवी, सचिन देसाई, पंकज शिरसाठ, शब्बीर मणियार, सुकन्या नरसुले, साधना कळंगुटकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page