माजी गृह राज्यमंत्री आम.दिपक केसरकर यांचा सल्ला
*💫सावंतवाडी दि.०९-:* शिवसैनिकांनी आता एकामेकांमधील मतभेद विसरून पक्ष वाढीसाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचा मान राखा आणि पक्षामध्ये इन्कमिंग वाढवा असे आवाहन माजी गृह राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी मळगाव येथे शालू हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संपर्क अभियान शुभारंभ कार्यक्रमात बोलताना केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आहे. त्यानी मराठी माणसाला ताठ मानेने नेतृत्वाची संधी दिली आहे. यावेळी आपण चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी आणला परंतु, तो अखर्चित राहिला अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी चांदा ते बांदा योजनेतून आलेल्या हळदीची रोपे भाजप वाले लावत आहेत. त्यामुळे केलेल्या कामाचे श्रेय शिव सैनिकांनी घ्यावे असे आवाहन आमदार दिपक केसरकर यांनी केले आहे.
