पाच विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तर एकाला रौप्यपदक
*💫मालवण दि.०९-:* जून महिन्यात घेण्यात आलेल्या ऑनलाईन ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. यामध्ये पाच विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक तर एका विद्यार्थ्याने रौप्य पदक पटकाविले आहे. ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत भंडारी प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथी मधील आर्यन गणपत वेंगुर्लेकर (९३ गुण), प्रथमेश प्रमोद चव्हाण (८७), इयत्ता दुसरी मधील स्वरा रुपेश बांदेकर (९८), हिमांशू संतोष मालवणकर (९६) आणि इयत्ता पहिली मधील आदित्य देविदास हारगिले (९९) या पाच विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल पटकाविले. तर इयत्ता पहिली मधील )स्पृहा संदीप भोवर (९३) हिने सिल्व्हर मेडल पटकाविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना भंडारी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद भगत, श्रीमती कांबळी, सौ. राधा दिघे, श्री. भुपेश गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
