Headlines

एन डी ए प्रवेश परीक्षेत मालवणच्या साहिल साठे याचे सुयश

*💫मालवण दि.०९-:* लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एन.डी.ए )प्रवेश परीक्षेत नाशिक येथील भोंसला स्कुलचा विद्यार्थी साहिल अनिल साठे याने यश संपादन करून प्रवेश परीक्षेत यशाचे स्थान निश्चित केले.साहिल हा मालवण येथील सागरी सुरक्षा दलाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल साठे यांचा मुलगा आहे मालवण येथील साहिल साठे याचे पाचवी ते दहावी शिक्षण मालवण येथील रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये झाले. इयत्ता दहावीच्या परीक्षेत त्यानेव्ही ९५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यावर भोंसला मिलिटरी स्कूल, नाशिक मध्ये प्रवेश घेत बारावी पर्यतचे शिक्षण घेतले . आता राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या प्रवेश परीक्षेतही त्याने यश मिळवले आहे. या यशाबद्दल त्याचे भोंसला स्कुलच्या संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, कार्यवाह हेमंत देशपांडे, कोषाध्यक्ष शीतल देशपांडे, शालेय समितीचे अध्यक्ष अतुल बेदनकर, समादेशक ब्रिगेडियर मंगलमूर्ती मसूर, विशिष्ट सेवा मेडल प्राचार्य राजेंद्र जगताप, पर्यवेक्षक विशाल जोशी यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page