…म्हणूनच खाजगी आस्थापना वादाच्या भोवऱ्यात:बाळू मेस्त्री
*💫कणकवली दि.०१-:* कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांचे आर्थिक शोषण होऊ नये . म्हणून शासनाने उपचारांसंबंधीचे नियम आणि दरपत्रक ठरवून दिले आहे . खाजगी रुग्णालये त्याप्रमाणे दर आकारणी करतात की नाही . यावर नियंत्रण ठेवण्याकरीता दर नियंत्रण समिती नेमण्यात आली आहे . पण हीच दर नियंत्रण समिती लाल फितीच्या कारभारात अडकली आहे . त्यामुळे रुग्णांच्या तक्रारींचा निपटारा वेळेत होत नसल्याने खाजगी आस्थापना वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत .त्यामुळे कोविड दर नियंत्रण समितीची चौकशी करावी अशी मागणी कलमठ येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे. बाळू मेस्त्री म्हणतात,कोरोना काळात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची काळजी घेण्यात आणि त्यांच्यावर उपचार करण्यात शासकीय रुग्णालयांसोबत काही खाजगी रुग्णालयांनीहीमहत्त्वाची भूमिका बजावली आहे . वेळोवेळी अशा सर्व व्यवस्थापनांचे ऋणही समाजाने सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे . महामारीच्या काळात रुग्णांना योग्य दरात अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा मिळावी . जर कोणी अवाजवी पैसे रुग्णाकडून किंवा रुग्णाच्या नातेवाईकांकडून उकळत असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे . पण दर नियंत्रण समितीच्या भोंगळ कारभारामुळे खाजगी रुग्णालयांची बदनामी होत असल्यामुळे खाजगी कोवीड सेंटर बंद केल्यास त्याचा ताण शासकीय यंत्रणेवर येऊन सर्व यंत्रणा कोलमडू शकते . ही शक्यता गृहित धरुन आपण वेळीच यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी . या सर्व प्रकारामुळे कोवीड रुग्ण उपचाराकरीता पुढे येत नसल्याचे जाणवते . यामध्ये आवश्यक सुधारणा झाल्यास मृत्यू दरही घटू शकतो . तरी विधी , सेवा प्राधिकरणामार्फत रुग्णांच्या तक्रारींची तातडीने निपटारा करावा व अगोदरच घाबरुन गेलेल्या नागरीकांमधील संभ्रम दूर करावा अशी मागणी बाळू मेस्त्री यांनी केली आहे.
