माणगाव खोऱ्यासाठी आ. वैभव नाईक यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न

*💫कुडाळ दि.०१-:* माणगांव खो-यातील शिवसेना पदाधिकारी व नागरीकांच्या मागणीनुसार सुसज्ज रूग्णवाहिका कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपलब्ध करून दिली आहे. आज माणगाव तिठा येथे या रुग्णवाहिकेचे लोकार्पण शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. आरोग्याच्या दृष्टीने जनतेची समस्या लक्षात घेऊन आमदार वैभव नाईक यांनी माणगावसाठी रुग्णवाहिका देण्याचा शब्द नागरिकांना दिला होता. दिलेला शब्द त्यांनी पूर्ण करत रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. माणगाव खोरे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे येथे अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत,अनेक कामे प्रस्तावित आहे येत्या काळात लवकरच हि कामे पुर्ण केली जाणार असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,शिवसेना नेते संदेश पारकर ,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, जि. प. गटनेते नागेंद्र परब, जि. प. सदस्य राजू कविटकर, उपसभापती जयभारत पालव, तालुकाप्रमुख राजन नाईक, विकास कुडाळकर, हरि खोबरेकर,बबन बोभाटे,अतुल बंगे,संतोष शिरसाट, श्रेया परब, मथुरा राऊळ, कृष्णा धुरी, प्रमोद धुरी, योगेश धुरी ,रमाकांत ताम्हाणेकर, रामभाऊ धुरी,अजित करमलकर,कौशल जोशी, आदींसह माणगाव विभागातील सरपंच व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपलब्ध होते.

You cannot copy content of this page