मालवण ग्रामीण रुग्णालयात महिलेची पर्स चोरीस

मालवण (प्रतिनिधी) मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी पतीला दाखल केलेल्या एका महिलेची पर्स चोरीस गेल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. पर्समध्ये रोख रक्कम पाच हजार रुपये तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक एटीएम असल्याची माहिती संबंधित महिलेने दिली आहे. दरम्यान मालवण पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात येत अधिक माहिती घेत अधिक चौकशी सुरू केली आहे.

You cannot copy content of this page