असलदेत विद्युत तारांचा स्पर्श होवून म्हैस जागीच गतप्राण

नशिब बलवत्तर म्हणून मालक बालंबाल बचावले

*💫कणकवली दि.२८-:* कणकवली तालुक्यातील असलदे शिवाजी नगर येथे गुरे चरायला घेऊन गेलेल्या नंतर घरी परतत असताना पडलेल्या विद्युत तारांचा स्पर्श होवून गाबण असलेली म्हैस जागीच गतप्राण झाली असून नशिब बलवत्तर म्हणून गुरांच्या बरोबर असलेल्या सौ.कोमल विठ्ठल खरात या बालंबाल बचावले आहेत ‌‌. याबाबत लगेचच मालक महेश विठ्ठल खरात यांनी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांना माहिती दिली असता त्यांनी ताक्ताळ वायरमन यांना तातडीने बोलावून विज पुरवठा बंद करण्यात आला . नांदगाव पशुधन विकास अधिकारी डॉ कांबळे यांनी तात्काळ धाव घेऊन सदर पंचनामा केला आहे.यावेळी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर,भाई मोरजकर,पप्पी सापळे,गजा लोके , महेश खरात ,लायनमन यासिर मास्के,कदम , तांबोळी आदींनी धाव घेतली होती. यावेळी विद्युत अभियंता श्री पंडित यांच्याशी संपर्क साधून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page