प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान जिल्हाध्यक्षपदी आशीष नाबर

राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मुकेश शर्मा व महामंत्री भगवान बाबुल यानी दिले नियुक्ती पत्र

*💫मालवण दि.२८-:* प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी आशिष मुकुंद नाबर यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे नियुक्ती पत्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुकेश शर्मा व राष्ट्रीय महामंत्री भगवान बागुल यांनी नाबर यांना दिले आहे. प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मुकेशजी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय उपाध्यक्ष रामकुमार पाल, शिवाजीराव देवकर, राष्ट्रीय महासचिव भगवान बागुल, महिला प्रदेश अध्यक्ष, सौ, सुलोचना चौधरी, प्रदेश महासचिव, प्रदेश उपाध्यक्ष, दत्तप्रसाद आबीलवादे, कोकण विभाग अध्यक्ष, संजय पाटणकर, सर्व प्रदेश, पदाधिकारी यांचे संमतीने संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नियुक्त करण्यात आले होते . यात सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी आशिष नाबर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र आशिष नाबर यांना देण्यात आले आहे. या नियुक्ती बद्दल श्री. नाबर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page