संसाराचे नियोजन करणे महत्वाचे

मुंबईतील मिलेनियल मॅरेंज कोच सौ. लीना परांजपे यांचे यांचे प्रतिपादन

मालवण (प्रतिनिधी) लग्न हे एका दिवसाचे आणि दोन कुटुंबाचे असते. मात्र संसार हा दोघांचा आणि आयुष्यभराचा असतो. लग्नाचा निर्णय हा दोघांचा असतो त्यामुळे सर्व गोष्टी सांभाळत संसार करण्याची तयारी दोघांचीही असली पाहिजे, म्हणूनच संसाराचे नियोजन करणे महत्वाचे असते असे प्रतिपादन मुंबईतील मिलेनियल मॅरेज कोच सौ. लीना परांजपे यांनी ऑनलाईन पद्धतीने झुम ऍपद्वारे मार्गदर्शन करताना केले रोटरी क्लब मालवण आणि एकता मित्रमंडळ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लग्न आणि संसार यांचं मिलन रेशीमगाठी आयुष्य भरासाठी या विषयावरील कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने झुम ऍपद्वारे संपन्न झाली. यात प्रमुख मार्गदर्शक सौ. लीना परांजपे यांनी मार्गदर्शन केले. लग्न आणि संसार यांचं मिलन, संसारातील जबाबदाऱ्या, लाॅकडाऊनमधे होणारी भावनिक घुसमट, नवीन जोडीदार व आईवडील यामधील नात्यातील तुलना अशा विविध विषयांवर सौ. लीना परांजपे यांनी मार्गदर्शन केले. लग्न हे एक अतूट बंधन असून असे बंध जुळवताना विचारपुर्वक निर्णय घेणं ही लग्नाची गरज आहे. आजच्या वेगवान युगात निर्णय सुद्धा तातडीने घेतले जातात. नव्या नवलाईचे दिवस संपल्यानंतर हेच तातडीने केलेले लग्न थोडे डळमळू लागते. हळूहळू सुरू होणारे वाद, भांडणं कधी संसाराचा पाया पोखरायला सुरुवात करतात हे मात्र ह्या जोडप्याला कळत नाही. संसार कसा सांभाळतात हेच हल्लीच्या काळातील जोडप्यांना माहीत नसते. त्यामुळे मग सोडून जाणे, वेगळं राहणे, अगदी घटस्फोट घेणे हाच पर्याय समजून पाऊल उचलले जाते. अशा वेळी ह्या जोडप्यांना सावरण्याची, आधाराची आणि सांभाळण्याचं कौशल्य शिकण्याची असते, असेही सौ. परांजपे यांनी सांगितले. या ऑनलाईन कार्यक्रमात रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष ऍड. हेमेंद्र गोवेकर, सचिव उमेश सांगोडकर, अमेय देसाई, सुविधा तिनईकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, डॉ. लीना लिमये, प्रसन्ना मयेकर, विजय पांचाळ, महेश काळसेकर, मनोजकुमार गिरकर आदी व इतर सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page